Tuesday 25 February 2014

संधीवात व पॅरालिसिस करीता संपुर्ण उपचार पद्धती.

संधीवात व पॅरालिसिस करीता संपुर्ण उपचार पद्धती.
*मणक्याचे विकार(Spondylysis)  - (स्पॉन्डिलायसिस) मणक्यामध्ये गॅप, मणक्याची झीज,मणका                                                                     सरकणे,हातापायाची आग होणे,हात व पायाला मुंग्या येणे,जड होणे.
*गुडघे दुखणे(knee pain) -                   गुढघ्यात पाणी होणे,आवाज येणे,हाडांची झीज होणे.
*संधीवात(Arthritis) -                       सतत सांधे दुखणे,सांधे सुजणे.
*आमवात(Rh.Arthritis) -                 एकाच वेळी अनेक सांधे राहुन राहुन दुखणे,सुजणे.
*कंपवात(Parkinson’s Disease) -       हात,पायाची थरथर होणे.
*गृध्रसीवात(Sciatica) –                   कमरेच्या खुब्यापासुन वेदना होणे,मांड्या गुढगा व घोटा यात वेदना,हातात                                                            - पायात मुंग्या व चमक भरणे.
*सिरागत वात(Vericose Veins) –   सर्वांगास ठणका लागणे,हाता-पायाच्या शिरा मोठ्या होणे.
                                                        याचबरोबर सांधे वाकडे होणे तसेच सांधे मुरगळणे इत्यादी लक्षणे दिसणे.

खरच,दोन पोलादाचे बार एकमेकांवर घासले तरी काही काळाने ते उगाळुन गुळगुळीत होतात परंतु मणक्याच्या बाबतीत अस घडत नाही कारण शरीरातील पोषक घटकांकडुन ही झीज भरुन येत असते.
मग हाडांची झीज का होते ?
१)अस्थी पोषक तत्वाचा अभाव व २)पोषण करणा-या मार्गात येणारा अडथळा या दोनच गोष्टींनी हाडाची झीज व मणक्यातील चकत्यांची झीज होते. या गोष्टी सुधारल्या तर इतर हाडांप्रमाणे मणक्याच्या हाडांची झीज भरुन काढाता येते.
=================================================================================

पॅरालिसिस अथवा पक्षाघात
*शरीराच्या ठराविक एका किंवा दोन्ही बाजुंची हालचाल संवेदना जाते,तो भाग जड वाटतो,वाकडा-लुळा होणे.
*स्नायुंमध्ये बळ राहात नाही,शेवटी अवयव सुकुन जातो.
*बोलणे बंद किंवा अडखळत बोलणे,तोंड वाकडे होते.,याच अवस्थेत रुग्णाला संपुर्ण आयुष्य घालावावे लागते.
कारणेः- मेंदूचे विकारः-मेंदूची गाठ,रक्तस्राव होणे,मेंदूवर दाब येणे.इत्यादी.
अपथ्यकर आहार विहार,बी.पी वाढल्याने/कमी झाल्याने इतर आजाराचा उपद्रव या स्वरुपात.
=================================================================================
श्री संपुर्ण उपचार पद्धतीः
(ठराविक दिवसांचा श्री संपुर्ण उपचार पद्धतीने रुग्णात लक्षणीय सुधारणा होते.)
*आयुर्वेदीय औषधी उपचार- वाढलेल्या वाताला नियंत्रीत करणारी वनस्पतीजन्य व सिध्द रसौषधी व सिध्द तैल                                               द्रव्ये.

*आयुर्वेदीय आहार उपचार- दैनंदिन आहार,विहार जो वाढलेले दोष कमी करेल व शरीराचे योग्य पोषण करेल.

*विशेष पंचकर्म उपचार-
१)सर्वांग स्नेहन- विशिष्ठ प्रकारच्या औषधी तेलाने मसाज उपचार पद्धती,ज्यामुळे वाढलेला वात कमी होतो.स्नायू                            रिलॅक्स होण्याकरिती व स्नायूंना बल मिळावण्याकरीता.
२)सर्वांग स्वेदन- वातघ्न द्रव्यांची औषधी वाफ ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते,व वेदना कमी होतात,तसेच मालिश                             केलेली तेला त्वचेवरिल रोमरंध्रे खुली झाल्यामुळे स्नायुपर्यंत पोहचतात.
३)बस्ती उपचार(enema)-आयुर्वेदातील अर्धी उपचार पद्धती.या उपचाराने मणक्याच्या गॅप,संधीवात,मेंदूची विकृती                           सुधारते,संवेदना आणणे,हाडांची झीज भरुन काढणे.व वाताच्या इतर सर्व आजारात उपयोगी.
४)कटीबस्ती/मन्याबस्ती/जानुबस्ती- वेदना असणा-या भागावर पाळे करुन कोमट तेल भरणे व जिरवणे.यामुळे तेल                         खोलवर पोहचुन,आखडलेले स्नायूबंध खुले होतात व वेदना कमी होतात.
५)लेप-            औषधी वनस्पती द्रव्यांचा लेप मांसाच बळ वाढवितो,संवेदना येतात,सुकलेला शरीरभाग सुधारतो.
६)रक्तमोक्षण-ठणकणा-या भागावर जळु लावुन दुषित रक्त काढणे त्यामुळे त्या भागाचे रक्ताभिसरण सुधारते.
७)नस्य –       मेंदूच्या पेशींचे बळ सुधारते.

*Acupuncture- स्नायू व सांधे यांच्या वेदना त्वरीत दूर करणारे उपचार.

*physiotherapy-स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती.

***वरील संपुर्ण उपचार पद्धतीमध्ये,रुग्णास सरासरी १० ते २० दिवस दररोज दवाखान्यात यावे लागेल अथवा राहावे लागेल,पोटातुन औषधी साधारणतः २ ते ३ महिने घ्यावी लागतील.व्यक्ती,व्याधी व प्रकृती परत्वे उपचाराचा कालावधी बदलु शकतो.

*** योग्य आहार,योग्य व्यायाम व योग्य उपचार यांच्या सहाय्याने आपण नक्कीच व्याधीमुक्त होवु शकतो.
========================================================================
वैद्य.प्रशांत दौंडकर पाटील यांचे

श्री आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर
सर्वे नं.४३,पठारे-ठुबे नगर,बालाजी हॉस्पिटलच्या मागे,चंदननगर ,नगररोड,पुणे.
वेळःसोमवार ते शनिवार सकाळी १० ते २,संध्या ५ ते ९.
फोनः020-65303430/65007008/9850498075/9922146452.

Web site:www.ayurvedandpanchakarma.com/www.garbhasanskarpune.com