Tuesday 17 December 2013

आयुर्वेद व पंचकर्म उपचार पध्दती

Shree ayurved- the way to healthy life

आयुर्वेद व पंचकर्म उपचार पध्दती

‘’ पंचकर्म ‘’ म्हणजे पाच प्रकारच्या शरीर शुध्दीक्रिया ! तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली व नियंत्रित प्रकाराने हे उपचार केले जातात.

१.वमन उपचार – म्हणजेच बिघडलेला कफदोष उलटीद्वारे काढुन टाकुन शरीरशुध्दी करणे.मुख्यत; कफासाठी व काही प्रमाणात पित्त्तासाठी हा उपचार केला जातो. जुनाट दमा, खोकला, कान, नाक, घसा,डोळे यांचे विकार त्वचाविकार, अम्लपित्त्त, वजन कमि इ. विकारांसाठी वमन केले जाते. वसंत ॠतु म्हणजे चैत्र-वैशाख (मार्च-एप्रिल) महिन्यात कफदोष वाढुन कफाचे रोग होण्याची प्रव्रत्त्ती वाढते. त्यामुळे या वेळी वमन दिले जाते.

२. विरेचन उपचार;- मुख्यत; पित्त्त्तासाठी असणा-या या उपचारामध्ये जुलाबाद्वारे बिघड्लेले पित्त्त्त काढुन टाकले जाते. त्यामुळे विविध पित्त्त्तविकार तसेच मुळव्याध , पोटातील जंत, पोटदुखी, पचनाचे विकार , रक्तविकार , काविळ , स्त्रीयांचे काहि खास आजार,शुक्रदोष, मुत्ररोग व जुनाट मलावरोध यासाठी विरेचन अतिशय उपयुक्त असते. तसेच शरद ऋतुमध्ये (सप्टे-ओक्तोबंर )आपल्या शरीरात पित्त्त्त वाढते म्हणुन तेव्हा विरेचन घ्यावे.

३.बस्ती उपचार ;- मुख्यतः वातदोषासाठी हा उपक्रम करतात . बिघडलेला वात हा शरीरामध्ये रोगनिर्मिती करणारे एक प्रबळ कारण असतो . या वात दोषाला जिंकणारि बस्ती चिकित्सा म्हणूनच फार महत्वाची आहे.                                                                                बस्ती म्हणजे औषधि एनिमा. आयुर्वेदाने बस्तीला ‘अर्धी चिकित्सा’ असे म्हणुन खुप महत्त्व दिले आहे.कारण बस्तीमुळे सर्वात वेगवान वातदोष जिंकुन जो रोगनिर्मिती करतो त्याला जिंकुन आपण स्वास्थ्य मिळवु शकतो. तसेच आतड्याचे विकार, स्त्री बिजदोष , वात व मलाचा अवरोध, पाळीच्या तक्रारी ,सांध्याचे विकार, संधीवात, हाडांचे व मणक्याचे विकार, मज्जारज्जुचे विकार,वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे यावरही विजय मिळवता येतो.     
     स्थान भेदाने बस्तिचे- उत्त्त्तर बस्ति (स्त्रि व पुरुष वंध्यत्व, मुत्ररोगासाठी) ,शिरोबस्ती, नेत्र बस्ती,जानु बस्ती, ह्र्द बस्ती इ.प्रकार पडतात

.४.नस्य;- म्हणजे नाकात ओषधे टाकणे. आपले नाक हे शिरोभागाचे द्वार आहे असे आयुर्वेद मानतो. म्हणुनच नाक-कान-डोळे, शिरोभाग व ज्ञानेंद्रिय यांच्या स्वास्थ्य रक्ष्णासाठी व त्यांच्या विकारंवरील उपचार म्हणुन नस्य केले जाते.

५.रक्तमोक्षण ;- आयुर्वेदाने रक्ताचे महत्व ओळखले आहे. शरीराला जीवन पोषण देणे सर्व इंद्रियांची प्रसन्नता व त्वचेचे सौंदर्य हे रक्तावरच अवलंबुन आहे. म्हणुन रक्तमोक्षण या चिकित्सेत बिघडलेल्या रक्ताला थोड्या प्रमाणात शरीराबाहेर काढुन टाकले जाते. रक्तदोषाबरोबर विविध त्वचारोग, नेत्ररोग, मुखरोग,जुनाट व्रण,मुरुमे,व्हेरीकोझ व्हेन्स यावरही रक्तमोक्षण केले जाते.अर्थातच ही चिकित्सा देण्याआधी रुग्णाचे बल, शरीरातील रक्ताचे प्रमाण यांचे काळजीपुर्वक परिक्षण केले जाते.                         
      या उपचारांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शरीरात साठलेले दोष किंवा विषारी पदार्थ बाहेर काढुन टाकले जातात. त्यामुळे गुंतागुंतीच्या आजारांवरही उपचार करता येतात .तसेच दीर्घकाळ ओषध घेउनही बरे न होणारे विकार पुर्णतः बरे होतात . या उपचारांनी शरीराची शुध्दी होते. यामुळे पेशींना नवचैतन्य प्राप्त होते. म्हणुनच तारुण्य टिकवणारी ओषधे देण्यापुर्वी पंचकर्म चिकित्सा देणे गरजेचे आहे.          

तुम्ही स्वस्थ असा किंवा रुग्ण ,पंचकर्म चिकित्सा तुम्हाला महत्वाची आहे.

1 comment:

  1. Great... Excellent sharing.. This is very helpful for beginers. Read that provide me more enthusiastic. This helps me get a more knowledge about this topic. Thanks for this.
    Informatica Training in Chennai Mylapore

    ReplyDelete